गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

(RRB Technician) भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9000 जागांसाठी भरती

 

Railway Recruitment Board 2024 : तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी! भारतीय रेल्वेत ९००० जागांसाठी होणार भरती

भारतीय रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. रेल्वे भर्ती बोर्ड म्हणजेच आरआरबीने (RRB) एक नोटीस जारी केली आहे. भरतीसाठी तात्पुरती टाइमलाइन असलेली अधिकृत नोटीस जाहीर केली आहे. लवकरच भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख, किती जागांसाठी भरती असणार आहे हे आपण जाणून घेऊ.



अधिकृत सुचनेनुसार रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत ‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) या पदासाठी भरती सुरु होणार आहे. तसेच या पदासाठी एकूण ‘९०००’ रिक्त जागांसाठी प्रवेश अर्ज मागवले जाणार आहेत. या महिन्यात उमेदवारांसाठी अधिसूचना प्रकाशित केली जाईल. त्यानंतर इच्छुक उमेदवार https://indianrailways.gov.in/ इथे ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. तसेच ऑनलाइन अर्ज सादर करणे मार्चमध्ये सुरू होईल आणि एप्रिल २०२४ मध्ये संपेल.

पदाचे नाव: टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वय गणकयंत्र: वय मोजा

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

Notification:-Click Here

Apply:-Click Here



पंजाब नॅशनल बँकेत 1025 जागांसाठी भरती, 'इतका' मिळेल पगार

 

पंजाब नॅशनल बँकेत 1025 जागांसाठी भरती

पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या 1025 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या 1025 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 7 फेब्रुवारी 2024 पासून सुरु.




पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावग्रेड/स्केलपद संख्या
1ऑफिसर-क्रेडिटJMGS I1000
2मॅनेजर-फॉरेक्सMMGS II15
3 मॅनेजर-सायबर सिक्योरिटीMMGS II05
4सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटीMMGS III05
Total1025

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य.
  2. पद क्र.2: (i) MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य.   (ii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA   (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA   (ii) 04 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 28 वर्षे
  2. पद क्र.2: 25 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3: 25 ते 35 वर्षे
  4. पद क्र.4: 27 ते 38 वर्षे

Fee: General/OBC: ₹1180/-   [SC/ST/PWD: ₹59/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2024

Notification:Click Here

Application:-Click Here

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 जागांसाठी भरती

(UBI) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 जागांसाठी भरती


 Union Bank of India Bharti 2024 – युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 606 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘ चीफ मॅनेजर , सिनियर मॅनेजर , मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Union Bank अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 606 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. ibpsonline.ibps.in/ubisojan24/ या संकेतस्थळावर 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत.


पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नावस्केलपद संख्या
1चीफ मॅनेजरSMGS -IV05
2सिनियर मॅनेजरMMGS -III42
3मॅनेजरMMGS – II451
4असिस्टंट मॅनेजरJMGS – I108
Total606

शैक्षणिक पात्रता: [Gen/OBC: 60% गुण, PWD: 55% गुण]

  1. पद क्र.1: (i) B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
    /सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा  MCA किंवा  M.Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स)  (ii) 10 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
    /सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा  MCA किंवा  M. Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) + 07 वर्षे अनुभव  किंवा  पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
    /सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा  MCA + 07 वर्षे अनुभव  किंवा पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 02/04 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन /कॉम्प्युटर सायन्स  / IT / टेक्सटाइल/केमिकल)

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2024 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 30 ते 45 वर्षे
  2. पद क्र.2: 28 ते 38 वर्षे/25 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3: 25 ते 35 वर्षे/25 ते 32 वर्षे/26 ते 32 वर्षे
  4. पद क्र.4: 20 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: GEN/EWS/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2024

NOTIFICATION:-Click here

APPLICATION:-Click Here



बुधवार, २४ जानेवारी, २०२४

Talathi Bharti Result 2023: तलाठी भरती २०२३ची निवड यादी जाहीर; निवड यादीसोबत प्रतिक्षा यादीही जाहीर

 तलाठी भरती २०२३ची निवड यादी जाहीर; निवड यादीसोबत प्रतिक्षा यादीही जाहीर

 

राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी मंगळवारी रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर  करण्यात आली. या  परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच  जाहीर झाली होती. अंतिम निवड यादीची प्रतीक्षा होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा ही अंतिम यादी जाहीर करण्यात आली.

राज्यातील २३ जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

दरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली या २३ जिल्ह्यांमधील निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.



राज्यात तलाठी पदाच्या चार हजार ४६६ रिक्त जागांसाठी जाहिरात निघाली होती. यासाठी राज्यभरातून दहा लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. तलाठी परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यात घेण्यात आली होती. 

महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती २०२३ मधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीचा पुढील टप्पा म्हणून निवड यादी व प्रतीक्षा याद्या तयार करण्याचा होता. त्यानुसार राज्यातील २३ जिल्ह्यांमधील निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केली आहे. उर्वरित आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे.” असे भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त संचालक तथा तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी प्रस्तुत केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप तसेच हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते आठ ऑक्टोबरदरम्यान मुदत देण्यात आली होती. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या ९ हजारांहून अधिक आक्षेप टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात आले.

त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केले होते.

मात्र, हे आरोप, दावे फेटाळत भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा अंतिम यादी जाहीर करण्यात आली. ही यादी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

निवड यादीसोबत प्रतिक्षा यादी-CLICK HERE

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

परभणी जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 304 जागांसाठी भरती

 

परभणी जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 304 जागांसाठी भरती


 परभणी जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Parbhani Bharti 


अ. क्र.  उपविभागपद संख्या
1गंगाखेड90
2परभणी55
3सेलू105
4पाथरी54
Total304

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट: 15 जानेवारी 2024 रोजी 25 ते 45 वर्षे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.800/- [मागासवर्गीय/आ.दु.घ. : रु.700/-]

● वेतनमान : नियमानुसार..

● नोकरीचे ठिकाण : परभणी जिल्हा

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

जाहिरात (Notification)Click Here

Online अर्ज: Apply Now


रेल्वेत लोको पायलटच्या 5696 जागांसाठी मेगा भरती

 




रेल्वेत लोको पायलटच्या 5696 जागांसाठी मेगा भरती; १०वी पास उमेदवारांना संधी.


    भारतीय रेल्वे विभागा अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट” पदांच्या एकूण 5696 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 20 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.







शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करने अनिवार्य आहे.
  • अर्ज 20 जानेवारी 2024 पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)


परीक्षा फी : सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि तृतीय श्रेणीतील उमेदवारांना फक्त 250 रुपये शुल्क भरावे लागेल.
पगार : 19,900/- ते 63, 200/- (स्तर-2) या वेतनश्रेणीनुसार पगार असेल
निवड कशी केली जाईल?
कम्प्यूटर बेस्ड टेस्ट -1 (CBT)
कम्प्यूटर बेस्ड टेस्ट -2 (CBT)
कम्प्यूटर बेस्ड एप्टीट्यूड टेस्ट (CBAT)
डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन
मेडिकल टेस्ट

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 246 जागांसाठी भरती

 

महावितरण विभागामध्ये महाभरती,  दहावी पास ते थेट पदवीधर…


नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. 
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया चंद्रपूर युनिटसाठी राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. आयटीआय झालेले उमेदवार ते अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
    विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही महावितरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलीये. दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय.


 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची ही संधी आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हीच ती संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही मोठी संधी आहे.
भरती प्रक्रिया तब्बल 246 पदांसाठी राबवली जात आहे. 

पद क्र.पदाचे नावट्रेड पद संख्या
1ITI अप्रेंटिसफिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, वायरमन, MMV, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, COPA, ICTSM, मेसन, मशिनिस्ट ग्राइंडर, MMTM, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स & स्टेनोग्राफर-इंग्लिश210
2पदवीधर अप्रेंटिसइलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक,18
3डिप्लोमा अप्रेंटिसइलेक्ट्रिकल, मेकॅनिकल18
Total246
11 जानेवारी2024 पासुन  उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
  3. पद क्र.3: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 25 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे.

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

Feeफी नाही

Notification:-click here

Apply Here:-Click Here

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.अंतर्गत भरती (MUCBF)

 

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.अंतर्गत भरती (MUCBF)


महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड (The Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Limited) अंतर्गत “कनिष्ठ लिपिक ग्रेड – 2” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे


    महाराष्ट्र राज्यातील ०८ जिल्ह्यात एकूण २१ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे रु. ११००.०० कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या नांदेड स्थित मुख्यालय असलेल्या एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत 'कनिष्ठ लिपिक ग्रेड - २' या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्स फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. १०/०१/२०२४ पासून ते दि. २२/०१/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरून पाठवावेत. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.



या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2023 आहे.


पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक ग्रेड-2

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर    (ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट: 31 डिसेंबर 2023 रोजी 22 ते 35 वर्षे.

नोकरी ठिकाण: नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे & औरंगाबाद

Fee: ₹1180/-

Official Website:-https://mucbf.com/

Apply Here:- click here

Notification:-click Here

(RRB Technician) भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9000 जागांसाठी भरती

  Railway Recruitment Board 2024 : तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी! भारतीय रेल्वेत ९००० जागांसाठी होणार भरती भारतीय रेल्वेत नोकरी करू इच्छिणा...