महावितरण विभागामध्ये महाभरती, दहावी पास ते थेट पदवीधर…
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया चंद्रपूर युनिटसाठी राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. आयटीआय झालेले उमेदवार ते अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही महावितरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलीये. दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची ही संधी आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हीच ती संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही मोठी संधी आहे.
भरती प्रक्रिया तब्बल 246 पदांसाठी राबवली जात आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | ट्रेड | पद संख्या |
| 1 | ITI अप्रेंटिस | फिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, वायरमन, MMV, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, COPA, ICTSM, मेसन, मशिनिस्ट ग्राइंडर, MMTM, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स & स्टेनोग्राफर-इंग्लिश | 210 |
| 2 | पदवीधर अप्रेंटिस | इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक, | 18 |
| 3 | डिप्लोमा अप्रेंटिस | इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल | 18 |
| Total | 246 |
11 जानेवारी2024 पासुन उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
- पद क्र.2: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.3: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: 25 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे.
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
Fee: फी नाही
Notification:-click here
Apply Here:-Click Here
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा