सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठात बऱ्याच वर्षांनंतर प्राध्यापक भरती केली जाणार आहे, तब्बल १११ प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे, ही भरती पूर्णवेळ पदासाठी केली जाणार आहे. या साठी १ जानेवारी पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने हा अर्ज करता येणार आहे. पुढील दोन महिन्यात ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रिक्त असलेल्या २१५ पैकी १११ रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार ही पदे भरण्यासाठी आवश्यक असणारी जाहिरात पुणे विद्यापीठाकडून शनिवारी प्रकाशित करण्यात आली आहे. प्राध्यापकांच्या जागांसह विद्यापीठाच्या प्रशासनामध्येही काही पदे भरण्यात येणार आहे. असे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | प्राध्यापक | 32 |
| 2 | सहयोगी प्राध्यापक | 32 |
| 3 | सहाय्यक प्राध्यापक | 47 |
| Total | 111 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: Ph.D + 10 रिसर्च पब्लिकेशन्स + 10 वर्षे अनुभव किंवा Ph.D + 10 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) Ph.D (ii) 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी (iii) 07 रिसर्च पब्लिकेशन्स (iv) 08 वर्षे अनुभव
- पद क्र.3: 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी+ NET/SET किंवा Ph.D
नोकरी ठिकाण: पुणे
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹500/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2024
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2024
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता:
The Assistant Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune – 411007
अधिकृत वेबसाईट: Click Here

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा